You are currently viewing कुडाळ येथे मेडीलॅब डायग्नोस्टिक सेंटर सुरू…

कुडाळ येथे मेडीलॅब डायग्नोस्टिक सेंटर सुरू…

कुडाळ :

कुडाळ येथील लक्ष्मी नरसिंह टॉवर येथे नव्याने मेडीलॅब डायग्नोस्टिक सेंटर काल (मंगळवार) पासून सुरू करण्यात आले आहे. ही पॅथॉलॉजिकल सेवा देणारी भारतातील एक अग्रगण्य लॅब आहे. आणि या लॅबची शाखा कुडाळ येथे सुरू करण्यात आली आहे. या लॅबचे उद्घाटन प. पू. विनायक अण्णा राऊळ महाराज यांच्या हस्ते झाले यावेळी त्यांच्या पत्नी बाईमाॅं तसेच अॅड. दिलीप नार्वेकर, रुपेश पावसकर, मेडीलॅब डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक डॉ. स्मृती अग्रवाल शर्मा, महेश धुरी, अमोल बर्वे, प्रसाद दळवी, प्रसाद कांंडरकर आदी मान्यवर उपस्थित होत.

यावेळी मेडीलॅब डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक महेश धुरी यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावना करताना या बाबतची माहिती दिली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांना आता मुंबई येथे विशेष अशा चाचण्या करण्यासाठी जावे लागणार नाही. याठिकाणी सर्व चाचण्या होणार आहेत. या चाचण्यांमध्ये होणारा वेळ आता कमी होणार आहे, असे त्यांनी सांगितले. तर उद्घाटक प. पू. विनायक अण्णा राऊळ महाराज यांनी सांगितले की, आपण फक्त सेवा देत राहायचं ईश्वर आपल्याला फळ देत राहणार आपल्या कार्यावर विश्वास असला पाहिजे. गोरगरिबांची सेवा करा आणि त्यातूनच परमात्मा मिळू शकतो अशा प्रकारची लॅब आपल्या जिल्ह्यात सुरू होते. हे खरोखरच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे असे सांगून डॉ. सौवदत्ती यांनी गेली ५० वर्ष रुग्णांची सेवा केली असेही त्याने यावेळी सांगितले. यावेळी प. पू. विनायक अण्णा राऊळ महाराज व त्यांची पत्नी बाईमाॅं यांची पाद्यपूजा करण्यात आली.

कुडाळ शहरामध्ये मुंबईच्या धर्तीवर अद्ययावत असे मेडीलॅब डायग्नोस्टिक सेंटर सुरू होत आहे ही बाब खरोखरच गौरवास्पद आहे असे पिंगुळीचे प. पू. सद्गुरू समर्थ विनायक अण्णा राऊळ महाराज यांनी सांगून जनसेवा हीच ईश्वर सेवा असे मानून काम करत रहा नक्कीच तुम्हाला यश येईल असेही त्यांनी या उद्घाटन प्रसंगी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − thirteen =