You are currently viewing जिल्हा नियोजनमधून मंजूर झालेल्या उसप मुख्य रस्त्याचे भूमिपूजन

जिल्हा नियोजनमधून मंजूर झालेल्या उसप मुख्य रस्त्याचे भूमिपूजन

उसप मुख्य रस्त्याचे जिल्हा नियोजन सदस्य बाबुराव धुरी यांच्याहस्ते भूमिपूजन

दोडामार्ग

जिल्हा नियोजन मधून मंजूर असलेल्या उसप मुख्य रस्त्याचे भूमिपूजन शिवसेना तालुकाप्रमुख तथा जिल्हा नियोजन सदस्य व प स सदस्य बाबुराव धुरी यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हा नियोजन मधून १० लाख रुपये मंजूर असून त्यातून हा रस्ता पूर्णत्वास येणार आहे. या रस्त्याला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री उदय सामंत, आमदार दिपक केसरकर, जिल्हा प्रमुख संजय पडते, जिल्हा नियोजन निमंत्रित सदस्य बाबुराव धुरी आणि तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांचे उसप गावचे सरपंच दिनेश नाईक व ग्रामस्थानी आभार मानले.

यावेळी बाबुराव धुरी यांच्यासह उसप सरपंच दिनेश नाईक, उपसरपंच अभिषेक गवस, निलेश नाईक, रमा नाईक, दीपक शेटकर, तुकाराम धुरी, कृष्णा गवस, प्रकाश पा. गवस आणि अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − two =