You are currently viewing आंबेली येथे कोंबड्या घेऊन जाणारा पिकअप पलटी

आंबेली येथे कोंबड्या घेऊन जाणारा पिकअप पलटी

दोडामार्ग

तिलारी घाटातून दररोज हजारो कोंबडी गोवा राज्यात जात असतात अशा एका चंदगड हुन गोव्याच्या दिशेने कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीचा आंबेली कोनाळकरवाडी येथे अपघात झाला. यात गाडी पलटी होऊन गाडीतील सर्व कोंबड्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे हजारोंचे नुकसानी झाले आहे.

आज सकाळी चंदगड हुन गोव्याच्या दिशेने कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीचे ब्रेक फेल झाल्याने आंबेली कोनाळकरवाडी येथील वळणदार रस्त्याच्या डाव्या बाजूच्या लोखंडी विद्युत खांबाला धडकली व एका बाजूने गाडी पलटी झाली.या अपघातात सुदैवाने चालक व त्याचा सहकारी थोडक्यात बचावले. तर गाडीमध्ये असणाऱ्या सर्व कोंबड्यांचा जागीच मृत्यू झाला.या अपघात ठिकाणी मृत कोंबड्यांचा मोठा खच पडला होता.

अपघातानंतर तात्काळ दोडामार्ग पोलिस दाखल झाले.त्याचबरोबर स्थानिक नागरिक यांनी मदतकार्य करून अपघातग्रस्त गाडी बाजूला काढली. यामध्ये अनेकांनी आज रविवार असल्याने चांगलीच मेजवानी केली

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × 1 =