कणकवली मुख्याधिकारी​​ अवधुत तावडे यांनी कार्यभार स्वीकारला

कणकवली मुख्याधिकारी​​ अवधुत तावडे यांनी कार्यभार स्वीकारला

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडून स्वागत

​​कणकवली

​कणकवली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी​पदाचा कार्यभार अवधुत तावडे यांनी आज स्वीकारला. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी त्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
श्री.तावडे यांनी सन २०१८ पर्यंत कणकवली नगरपंचायतचा सुमारे साडे तीन वर्षाहून अधिक काळ मुख्याधिकारीपदाचा कार्यभार सांभाळला होता. त्यांच्या कारकिर्दीत कणकवलीत अनेक मोहिमा राबविण्यात आल्या. तसेच स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेमध्ये सुद्धा कणकवली नगरपंचायत देशातील पश्चिम विभागीय झोनमध्ये अव्वलस्थानी राहिली होती. अतिक्रमण हटाव मोहीम राबवत त्यांनी राजकीय विरोध सुद्धा झुगारून लावला होता.
कणकवली येथून उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून त्यांची बदली झाली होती. व त्यानंतर तेथून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्रशासन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी पदावरून त्यांची पुन्हा कणकवली नगरपंचायत​​च्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती झाली. गुरुवारी तावडे यांनी रितसर मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. मात्र​ ​​​स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच ते सोमवार १२ एप्रिल पासून कार्यालयात हजर झाले. त्या वेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले

प्रतिक्रिया व्यक्त करा