You are currently viewing सावंतवाडीत मायनिंगचे बादशाह आहेत का..?

सावंतवाडीत मायनिंगचे बादशाह आहेत का..?

संपादकीय…

*सावंतवाडीत मायनिंगचे बादशाह आहेत का..?**

*पत्रकाराचा रुपेश राऊळ यांना सवाल*

*नक्की रोख कुणावर..?*

सावंतवाडी: आजगाव येथे (जेएसडब्ल्यू) जिंदाल कंपनी ड्रोनच्या सहाय्याने मायनिंग सर्व्हे करणार असल्याचे पत्र ४ जुलै रोजी आजगाव ग्रामपंचायतीला प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र शासन आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षणाला परवानगी देखील दिली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी सावंतवाडीतील एका पत्रकाराने “या प्रकरणात सावंतवाडीतील मायनिंगचे बादशाह सामील आहेत का..?” असा प्रश्न रुपेश राऊळ यांना विचारून खळबळ उडवून दिली..आणि त्याच्या प्रश्नाचा रोख अप्रत्यक्षपणे नाम.दीपक केसरकर यांच्याकडे होता की काय..? असा सवाल उभा राहिला.
सावंतवाडीतील या तरुण पत्रकाराच्या प्रश्नाचा रोख कोणाकडे होता हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज भासणार नव्हती. कारण, शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी या पत्रकाराच्या थेट प्रश्नाला उत्तर देताना “दीपक केसरकर कुटुंबीयांची १०० एकर पेक्षा जास्त जागा मायनिंग क्षेत्रात असून त्यात आंबा कलम बाग असल्याचे सांगत, वेळ आल्यावर केसरकरांचे पितळ उघडं पाडणार असा इशारा देत अप्रत्यक्षपणे पत्रकाराच्या प्रश्नाचा रोख असलेल्या नाम.दीपक केसरकर यांचाच आजगाव येथील नियोजित मायनींग प्रकल्पात सहभाग असल्याचा आरोप रुपेश राऊळ सह मायकल डिसोजा यांनी केला.
गेली १५ वर्षे पेक्षा अधिक काळ पत्रकारिता केलेल्या पत्रकाराने राज्याच्या जबाबदार मंत्र्यांचा उल्लेख “मायनिंगचा बादशाह” असा केल्याने उद्या आजगाव येथे पार पडणाऱ्या आजगावसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या बैठकीत सत्य न जाणताच नाम. केसरकरांच्या विरोधात पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे. येत्या काहीच महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या असल्याने या तरुण पत्रकाराच्या प्रश्नाचा फटका केसरकरांना बसू शकतो. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जे आरोप करायचे तेच आरोप अशाप्रकारे धिडसघाईने पत्रकार करू लागले तर बाळशास्त्री जांभेकरांच्या कल्पनेतील निरपेक्ष पत्रकारिता जिवंत राहील का..? असा प्रश्न अनेकांच्या मनाला स्पर्शून गेला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा