वैभववाडी
बालदिन सप्ताहानिमित्त घेण्यात आलेल्या भाषण स्पर्धेत कु. शौर्य बोडेकर यांने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन सप्ताह साजरा करण्यात आला. covid-19 चा प्रादुर्भाव सदर कालावधीत सर्वत्र असल्याने शालेय विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचा तालुकास्तरीय निकाल नुकताच जाहीर झाला आहे.
वैभववाडी तालुक्याचा स्पर्धानिहाय निकाल पुढीलप्रमाणे
भाषण स्पर्धा – इयत्ता पहिली व दुसरी- प्रथम- शौर्य चेतन बोडेकर विद्या मंदिर एडगाव नं.1, द्वितीय- तनिष्का भानुदास बुराण हेत नं 1, तृतीय- देवेंद्र महेंद्र गोसावी लोरे मांजलकरवाडी.
पत्रलेखन -इयत्ता तीसरी ते पाचवी- प्रथम-श्रीकांत श्रीकृष्ण पवार खांबाळे मोहितेवाडी, द्वितीय- आरुषी सुरेश जाधव उंबर्डे मराठी, तृतीय- वृषभ विजय चौरे भुईबावडा नं. 1, स्वरचित कविता वाचन – इयत्ता सहावी ते आठवी- प्रथम- तनिष्का विकास खानविलकर हेत नं.1, द्वितीय- अथर्व जयवंत मोरे माधवराव पवार विद्यालय कोकिसरे, तृतीय- शुभम समीर रावराणे सांगूळवाडी नं. 1, नाट्यछटा/ एकपात्री प्रयोग – इयत्ता सहावी ते आठवी – प्रथम- आदिती विनायक पवार केंद्रशाळा खांबाळे, द्वितीय- शुभम समीर रावराणे सांगूळवाडी नं. 1, पोस्टर तयार करणे – इयत्ता नववी ते दहावी – प्रथम- सानिका सुभाष गुरव लोरे हायस्कूल, निबंध लेखन इयत्ता नववी ते दहावी- प्रथम- गुरुप्रसाद मोहन हडशी नेर्ले हायस्कूल, द्वितीय- अविष्कार अनंत पालांडे नेर्ले हायस्कूल, तृतीय- प्राप्ती रविंद्र बाणे अर्जुन रावराणे विद्यालय वैभववाडी, बाल साहित्य ई संमेलन – इयत्ता पहिली ते बारावी प्रथम- प्रेम प्रदीप तांबे कोकिसरे नारकरवाडी, द्वितीय- शुभम समीर रावराणे सांगूळवाडी नं.1 या स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस रक्कम त्यांच्या बँक खाती वर्ग करण्यात येणार आहे. गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती वैभववाडी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शाळा समिती अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक व पालक यांच्याकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.