शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांची बैठक पार पडली

शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांची बैठक पार पडली

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली.

मुंबई प्रतिनिधी :

आज वाढलेला अभिनेत्री कंगना संदर्भात वाद आणि मराठा आरक्षणावरील निर्णय यावर चर्चा करण्या करता शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांची बैठक झाल्याचे व मुख्यमंत्र्यांच्या निवास स्थानी ही बैठक पारपडल्याचे समजते या बैठकीत संजय राऊत देखील उपस्थिती होते.

सुप्रीम कोर्टाचा मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय आल्यानंतर बुधवारी सायंकाळी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज वाढलेला कंगना वरील वाद आणि न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षण संबंधित निर्णय यावर चर्चा करण्यात आल्याचे समजते. या चर्चेत कंगना बद्दल चा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा