राज्यात सध्या तीन दिवस पुरेल इतकेच लसीचे डोस शिल्लक -राजेश टोपे

राज्यात सध्या तीन दिवस पुरेल इतकेच लसीचे डोस शिल्लक -राजेश टोपे

देशात सध्या लसीकरण सुरु असून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. पण राज्यात सध्या तीन दिवस पुरेल इतकेच लसीचे डोस शिल्लक असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी केंद्राकडे लसींचा पुरवठा कऱण्याची मागणी केली आहे. तसंच दिवसाला सहा लाख लसीकरणाचं टार्गेट पूर्ण करायचं असेल तर लोकांनाही सहकार्य करण्याची गरज बोलून दाखवली. यावेळी त्यांनी मुस्लीमांमध्ये लसीकरणाचा वेग वाढला पाहिजे असंही सांगितलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

“..तर तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात लसीकरण बंद पडू शकतं,” राजेश टोपेंनी व्यक्त केली भीती

“सहा लाखांच टार्गेट पूर्ण करायचं असेल तर लोकांनीही सहकार्य करणं आवश्यक आहे.गावागावात न घाबरता लसीकरण झालं पाहिजे. अनेकांमध्ये गैरसमज असून, काहीजण पसरवत आहे. मुस्लीमांमधील गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. मुस्लीम धर्मगुरू व राजकीय नेत्यांना आम्ही समजावण्याचा प्रयत्न केला आहे. मुस्लीमांमध्ये लसीकरणाचा दर कमी असून तो वाढवला पाहिजे. ते चांगला प्रतिसाद देत आहेत. मुस्लीमांमध्ये असलेले गैरसमज दूर होतील व ते ही लसीकरणाला प्रतिसाद देतील ही आशा आहे.

महाराष्ट्रात तीन दिवस पुरतील इतकेच लसीचे डोस शिल्लक

महाराष्ट्रात १४ लाख लसींचे डोस शिल्लक असून हा साठा केवळ तीन दिवस पुरेल अशी भीती व्यक्त करताना राजेश टोपे यांनी दर आठवड्याला ४० लाख लसींचा पुरवठा करण्याची केंद्राकडे मागणी केली आहे. “”महाराष्ट्रात लसीचे १४ लाख डोस शिल्लक असून ही तीन दिवसांपुरता साठा आहे. पाच लाखांच्या तुलनेत हे डोस तीन दिवसांत संपेल आणि महाराष्ट्रातील लसीकरण बंद होऊ शकेल. म्हणूनच दर आठवड्याला किमान ४० लाख लस पुरवठा केला पाहिजे. आज आम्ही साडे चार ते पाच लाखांपर्यंत आहोत. पण दोन दिवसांत दिवसाला सहा लाखांपर्यंत जाण्याची हमी मी देतो,” असं ते म्हणाले.

“केंद्र सरकार लस पाठवत नाही असं नाही पण वेग कमी आहे. ज्या पद्धतीने आव्हानात्मक बोललं जातं त्यापद्दतीने केलं जात नाही हे केंद्र सरकारला सांगणं आहे,” अशी टीका राजेश टोपे यांनी केली.

 

ऑक्सिजनचा पुरवठा करा

“ऑक्सिजनचा तुटवडा भासण्याची शक्यता असून आम्हाला जवळच्या राज्यातून ऑक्सिजनचा पुरवठा केला पाहिजे अशी मागणी केली. ती त्यांनी गांभीर्याने नोंदवली आहे,” अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली. राजेश टोपे यांनी यावेळी रेमडेसिवीरचा वापर प्रोटोकॉलनुसार करा असं आवाहन खासगी डॉक्टरांना करत ११०० ते १४०० च्या वर विकू नये अशी विनंती केली. तसंच त्याची साठेबाजी करु नका असंही म्हणाले.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा