अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आजपासून धावणार बसेस

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आजपासून धावणार बसेस

पुणे

अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी अखेर पीएमपी प्रशासनाने बसेसचे केले आहे. दि.7 एप्रिलपासून (बुधवार) शहरातील 20 मार्गांवर 41 बसेस धावणार आहेत. यामध्ये केवळ पालिका आणि शासकीय कर्मचारी, सरकारी आणि खासगी रुग्णालयांच्या कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

संचारबंदीच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारपासून शहरातील पीएमपीची सेवा स्थगित केली. मात्र अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच्या बससेवेबाबतच्या निर्णयाचा चेंडू पालिकेच्या कोर्टात गेला होता. अखेरीस मंगळवारी अतिरिक्त आयुक्तांच्या सूचनेनुसार ही बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा