कंगना च्या कार्यालयावर हातोडा…

कंगना च्या कार्यालयावर हातोडा…

कंगना च्या कार्यालयावर हातोडा …

मुंबई

वादाच्या भोवऱ्यात असलेली अभिनेत्री कंगना रणावत हिच्या मुंबईतील कार्यालयावर अनाधिकृत असलेले अंतर्गत बांधकाम म्हणून मुंबई महानगरपालिकेने हातोडा चालवीत कारवाई केली आहे.

या आधीच शिवसेना आणि कंगना मधे वाद चालूच होते.मात्र तिचे कार्यालय तोडण्यात आल्यामुळे कंगनाने मुख्यमंत्र्यांवर एकेरी उल्लेख करून निशाणा साधला आहे. कांगनाने व्हिडिओद्वारे उद्धव ठाकरेंवर प्रहार केला आहे. तिथे एकेरी उल्लेख करत म्हटले आहे की उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटत, फिल्म माफिया सोबत मिळून तुम्ही माझं घर आज तोडून मोठा बदला घेतला आहे.

आज माझं घर तुटलं उद्या तुमचा गर्वहरण होईल.लक्षात ठेवा वेळ हि नेहमी सारखी राहत नाही. पण तुम्ही माझ्यावर उपकार केले आहेत असं मी समजते. कश्मीरी पंडितांसोबत काय झालं होतं ते मला माहिती होतं पण आज मला हे जाणवलं आहे. आज मी देशाला वचन देते की, मी केवळ अयोध्येवर नाही तर काश्मीरवही सिनेमा बनवेल आणि नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करेल.. ही क्रूरता माझ्यासोबत घडली हे चांगलं आहे, कारण याला देखील एक अर्थ आहे. जय हिंद… जय महाराष्ट्र” असे ती म्हणाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा