You are currently viewing ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी!

ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी!

1 एप्रिलपासून बदलला हा नियम…

 

पोस्ट ऑफिसमधील खातेधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला हे माहित असणं आवश्यक आहे की, पोस्ट ऑफिस (Post Office) मधील बचत खात्याशी संबंधित काही नियमात बदल झाला आहे. हे नवे नियम 1 एप्रिल 2021 पासून लागू झाले आहेत. India Post Payment Bank ने आता पैसे काढणे, जमा कणे आणि  AEPS (आधार आधारित पेमेंट सिस्टमवर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात तुम्हाला पैसे जमा करणे आणि भरण्यासाठी देखील शुल्क द्यावे लागेल. जाणून घ्या कोणत्या खात्यांवर हे नियम लागू होणार आहेत.

जर तुमचे बेसिक सेव्हिंग खाते आहे तर तुम्हाला 4 वेळा पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. त्यापेक्षा अधिक वेळा ट्रान्झॅक्शन करण्यासाठी 25 रुपये किंवा 0.5 टक्के शुल्क द्यावे लागेल. तर पैसे जमा करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही आहे.

जर तुमचे सेव्हिंग आणि करंट अकाउंट आहे तर दर महिन्याला तुम्ही 25000 रुपये पैसे काढू शकता. यापेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी 25 रुपये शुल्क द्यावे लागेल. तर 10 हजार रुपयांच्या कॅश डिपॉझिटवर कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. मात्र त्यापेक्षा जास्त पैसे जमा करण्यासाठी कमीतकमी 25 रुपये शुल्क द्यावे लागेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा