संजय पडते, नागेंद्र परब यांचा पलटवार: आयुक्तांकडे चौकशीची मागणी करणार

संजय पडते, नागेंद्र परब यांचा पलटवार: आयुक्तांकडे चौकशीची मागणी करणार

सिंधुदुर्ग :

 

जिल्हा परिषदेला माजी पालकमंत्री दीपक केसरकर विद्यमान पालक मंत्री उदय सामंत यांनी शाळा दुरुस्तीसाठी करोडो रुपयांचा निधी दिला. पण तो निधी जिल्हा परिषद सत्ताधाऱ्यांनी मनमानी पणे आपल्या कार्यकर्त्यांना देऊन केवळ कार्यकर्त्यांना मेसेज काम केले. आलेल्या निधीचा अपव्याय केला असा गंभीर आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते व शिवसेनेचे जिल्हा परिषद गटनेते नागेंद्र परब सत्ताधारी भाजप वर केला.  दरम्यान, डाव्या होऊ नये म्हणून विद्यमान पालक मंत्री माननीय उदय सामंत यांनी काळजी घेतली. त्यामुळे सत्ताधिकार यांना मनमानी करता आली नाही म्हणून पोटशूळ उठून भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली आरोप करण्याचे सुरू केले असे सांगितले.

या प्रकरणी शिवसेना आयुक्तांकडे चौकशीची मागणी करून कळस झालेला निधी सत्ताधारी जिल्हापरिषद सदस्यांकडून वसूल करावा अशी मागणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली त्यांनी पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे जिल्हा परिषदेचा निधी अखर्चित राहिल्याचा आरोप केला होता. या आरोपाला पत्रकार परिषद जिल्हा प्रमुख संजय पडते व गटनेते नागेंद्र परब यांनी प्रत्युत्तर दिले. उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुका संघटक बबन बोभाटे, तालुकाप्रमुख राजन नाईक उपस्थित होते. पडते म्हणाले सत्ताधारी भाजप ने शाळा दुरुस्तीचा निधी आवश्यक असलेल्या शाळांवर खर्च घातला. आणि ज्या शाळांना दुरुस्तीची गरज होती त्या शाळांची कामे हाती घेतली नाही. जनसुविधेसाठी कोट्यावधीचा निधी आला प्रत्येक वेळी सभागृहात विरोधी गटाच्या वतीने आम्ही प्रश्न उपस्थित केले. पण त्याकडे सत्ताधाऱ्यांनी पूर्णतः दुर्लक्ष करून आपल्या मर्जीतील ठेकेदारांना दुरुस्तीची कामे दिली. शाळेचे छप्पर यांच्या जुन्या वाषांना कलर काढून ते वाशे शाळा इमारतीला बसवून जिल्हा परिषदेमध्ये भ्रष्टाचार केला. जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत भाजप कडे ३१ सदस्य असताना सुद्धा त्या सदस्यांवर त्यांना पहारा ठेवावा लागला. यातच शिवसेनेचा दरारा दिसून आला भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राजन मापसेकर, श्री देसाई यांना राजीनामा द्यावा लागला याचे राजन तेली यांनी आत्मपरीक्षण करावे. गेले वर्षभर तेली त्यांच्यासोबत आहेत त्यामुळे त्याचा अनुभव त्यांना अधिक आहे. पूर्वी पण तुम्ही त्यांच्यासोबत होता त्यामुळे कोण कोणाच्या आर्थिक व्यवहारासाठी होते. ते तुम्हाला सर्वज्ञात आहे आज जिल्हा परिषदेमध्ये सभापती बसले. ते खरं तर ते शिवसेनेचीच मेहेरबानी आहे.  कारण तुमच्यावर त्या चार जनाणांचा सभापतिपद देण्याची नामुष्की ओढवल्याचे पडते यांनी सांगितले. गटनेते नागेंद्र परब म्हणाले सिंधुरत्न योजनेत तीनशे कोटी पैकी 75 कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले आहेत. उद्योजकांच्या हाताला काम मिळेल या उद्देशाने पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्गाला कोट्यावधीचा निधी दिला. तर हा निधी आपल्या हातात लागणार नसल्याने भाजपच्यावतीने तेली यांनी आरोप करणे सुरू केले आहे. जिल्हा परिषद सेस अंतर्गत सत्ताअधिकाऱ्यांनी आपल्याच माणसांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे या प्रश्नी लवकरच आयुक्तांकडे तक्रार केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा