पुणे-सातारा महामार्गाची समस्या सुटणार तरी कधी?

पुणे-सातारा महामार्गाची समस्या सुटणार तरी कधी?

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर 1 एप्रिलपासून पुन्हा एकदा टोल वाढवण्यात आल्याने वाहनचालकांत नाराजी आहे. त्याविषयी विविध वाहनचालकांनी नोंदवलेले आक्षेप आणि महामार्ग प्राधिकरण यांच्यात सतत वाद सुरु असतो. कधी हा मार्ग निर्धोक होणार आहे, असे प्रश्‍न वाहनचालक सतत विचारत असतात.

या रस्त्यावर टोलच्या रांगांसकट अनेक अडथळे पार करताना संयम सुटत जातो. आणि मग घुसाघुशी सुरू होते. नियम पाळावेसे वाटले पाहिजेत असे नियम आणि सुटसुटीतपणा असावा. आपणच म्हणतो राजकारण्यांचा दबाव असतो, मग तक्रार करण्याचा उत्साह राहील का? साऱ्या जगण्यावर मरगळ येईल असे वातावरण आहे.

देशातल्या प्रत्येक राष्ट्रीय महामार्गावर स्पीडगनची व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये वावगे काहीही नाही वेगमर्यादेचे उल्लंघन करणे हे कायद्यानुसार गुन्हा आहे त्यामुळे स्पीडगन विषयी आक्षेप नोंदवणे चूक आहे, असे म्हटले जाते.पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर 1 एप्रिलपासून पुन्हा एकदा टोल वाढवण्यात आल्याने वाहनचालकांत नाराजी आहे. त्याविषयी विविध वाहनचालकांनी नोंदवलेले आक्षेप आणि महामार्ग प्राधिकरण यांच्यात सतत वाद सुरु असतो. कधी हा मार्ग निर्धोक होणार आहे, असे प्रश्‍न वाहनचालक सतत विचारत असतात.

या रस्त्यावर टोलच्या रांगांसकट अनेक अडथळे पार करताना संयम सुटत जातो. आणि मग घुसाघुशी सुरू होते. नियम पाळावेसे वाटले पाहिजेत असे नियम आणि सुटसुटीतपणा असावा. आपणच म्हणतो राजकारण्यांचा दबाव असतो, मग तक्रार करण्याचा उत्साह राहील का? साऱ्या जगण्यावर मरगळ येईल असे वातावरण आहे.

देशातल्या प्रत्येक राष्ट्रीय महामार्गावर स्पीडगनची व्यवस्था केलेली आहे त्यामध्ये वावगे काहीही नाही वेगमर्यादेचे उल्लंघन करणे हे कायद्यानुसार गुन्हा आहे त्यामुळे स्पीडगन विषयी आक्षेप नोंदवणे चूक आहे, असे म्हटले जाते.

तसेच पुणे-सातारा रस्त्यावर एका डायव्हर्जनच्या इथे सर्विस रोडला स्पीड ब्रेकर आहे. महामार्गावर टोल नाक्‍या व्यतिरिक्त कोठेही स्पीडब्रेकर नाही.

या रस्त्यावर वेग मर्यादेचे उल्लंघन होण्याइतका वेग घेता येतो असे वाटणे हेच विनोदी वाटल्याचे प्रवासी सांगतात. सामान्य नागरिकांना सतत गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे, आक्षेप न ऐकून घेणे, स्वतःची जबाबदारी पार न पाडता आक्षेप नोंदवणाऱ्या नागरिकांना बंधने घालणे हे आता अंगवळणी पडले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कोणत्याही तक्रारीसाठी 1033 ही हेल्पलाइन 24 तास सुरू असते आपण नोंदवलेली तक्रार निवारण होईपर्यंत ही तक्रार बंद केली जात नाही, असेही सांगतात. मात्र कोणीही प्रवासी किंवा हायवेचा वापर करणारे या सुविधेचा लाभ घेत नाहीत, हे वास्तव आहे.

पुणे-सातारा या मार्गावरील धांगवडी येथील उड्डाण पुलाचे काम सुरू झालेले दिसते. शेजारीच पांडव कालीन मंदिर आहे त्यामुळे येथे पांडव कालीन पुलाचे अवशेष असावेत असा एक समज होता. या महामार्गाचे काम एक ऐतिहासिक वास्तू किंवा काम म्हणावे लागू नये अशी आशा स्थानिकांकडून केली जात आहे.

सध्या साताऱ्याहून पुण्याला येताना शिरवळ ओलांडल्यावर परंतु नदी ओलांडण्यापूर्वी शिंदेवाडी फाटा लागतो तेथे रोज ट्रॅफिक जॅम अर्थात वाहतूक मुरंबा होऊ लागला आहे. म्हणजे आता लवकरच तिथे उड्डाणपूल होणार. म्हणजे अजून एक बाह्य वळण. म्हणजे अजून खड्डे, म्हणजे प्रवासाचा वेळ वाढणार, म्हणजे पुन्हा आंदोलन, म्हणजे पुन्हा निविदा, म्हणजे अजून वेळ, म्हणजे पुन्हा निविदा वाढवून, कालपव्यय होणार, अशी भीतीही नागरिकांना वाटते आहे. धांगवाडी उड्डाणपूल अजून सुरू होतोय, नसरापूर अधूनमधून बंद असतो, शिरवळ तीच गत. खड्ड्यांची तर किलोमीटर प्रमाणे नोंदी देऊ शकतील, असे नित्य प्रवास करणारे नागरिक सांगतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा