कुडाळ वासीयांच्या उद्रेकानंतर वादग्रस्त व्यक्तीच्या नावाचा फलक उतरविला..

कुडाळ वासीयांच्या उद्रेकानंतर वादग्रस्त व्यक्तीच्या नावाचा फलक उतरविला..

पोलीस ठाण्यात तक्रार का नाही?

कुडाळ शहरात घडलेल्या डॉ. अनिल नेरुरकर यांच्याबाबतीतील वसतिगृहातील विद्यार्थिनी व एका महिलेशी गैरवर्तनाच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथीत बातमीमुळे कुडाळ वासीयांचा उद्रेक होऊन पोलीस ठाण्यावर व कुडाळ हायस्कुल वर लोकांनी धडक दिली. कुडाळ शहराची होत असलेली बदनामी रोखण्यासाठी कुडाळ वासीयांनी तात्काळ कुडाळ हायस्कुलच्या इंग्रजी माध्यमाला दिलेले सदर व्यक्तीचे नाव काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती.
कुडाळ हायस्कुलच्या संस्थेने कुडाळ वासीयांनी केलेल्या मागणीला समर्थन देत लोकांच्या भावनांचा आदर करत इंग्रजी माध्यमाच्या शाळेला नाव दिलेला एक फलक काढण्यात आला व दुसरा फलक प्लास्टिक कापडाने झाकून ठेवण्यात आला आहे. संस्थेने केलेल्या या कारवाईने पुन्हा दुसरा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे, तात्काळ फलक हटविला म्हणजे डॉ. नेरुरकर यांच्याकडून घडलेल्या कथित गैरवर्तनाच्या बातमीमध्ये काहीतरी गौडबंगाल नक्कीच आहे. आग लागल्याशिवाय धूर कधीच येत नाही. याप्रमाणे घडलेल्या कथित प्रकरणात आणि निनावी पत्राने झालेल्या आरोपाबाबत योग्य ती चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कुडाळ वासीयांनी बैठक घेऊन पोलीस ठाण्यावर तसेच कुडाळ हायस्कुल वर धडक दिल्यानंतर आरोपांची चौकशी व सदर आरोप असलेली व्यक्ती शाळेच्या आवारात येण्यास मज्जाव केल्यानंतर शाळेवरील त्या व्यक्तीच्या नावाचा फलक काढला जातो परंतु पोलीस ठाण्यात त्या व्यक्ती विरोधात रीतसर तक्रार का दाखल करण्यात आली नाही? हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो.
कुडाळ शहराची झालेली बदनामी ही नक्कीच खेदजनक आहेच, परंतु घडलेल्या गैरवर्तनाच्या व्हायरल झालेल्या प्रकरणात खरोखरच तथ्य असेल तर कुडाळ हायस्कुलच्या संस्थेचे पुढचे पाऊल काय असणार? पोलीस निःपक्षपाती पणे चौकशी करून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करणार का? की पैशांच्या जोरावर प्रकरण दडपले जाणार? असे प्रश्न कुडाळ वासीयांमधून उपस्थित केले जात आहेत.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा