वायरीत विजेच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त…

वायरीत विजेच्या समस्यांमुळे नागरिक त्रस्त…

देवबाग :

वायरी भूतनाथ गावात विजेच्या समस्यांमुळे नागरिक आणि पर्यटन व्यावसायिक त्रस्त झाले पर्यटन व्यावसायिकांना कमी दाबाच्या विद्युत पुरवठा यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. गावात अनेक ठिकाणी तारा विद्युत पोल जीर्ण झाले आहेत. याबाबत वारंवार वीज वितरण कंपनीचे लक्ष वेधूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. कोविड सारख्या साथरोगाच्या काळात उद्योगधंदे बंद असताना येथील पर्यटन व्यावसायिक व ग्रामस्थांनी वीज बिल भरणा करून सहकार्य केले आहे. ज्याप्रकारे बिल भरण्यासाठी तगादा लावता त्याचप्रकारे नागरिकांना चांगल्या सुविधा द्या, असे ग्रामस्थांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरिश्‍चंद्र खोबरेकर, पर्यटन व्यवसायिक मिलिंद झाड, घनश्याम झाड, रविंद्र खानविलकर, आनंद हडकर, ज्ञानेश्वर धुरी, गुरुनाथ जोशी आदी उपस्थित होते. यावेळी खोबरेकर म्हणाले वायरी तारकर्ली देवबाग या गावात पर्यटन व्यवसाय पुरेसा वाढला आहे. त्यामुळे पुरेशा दबाव विजेची गरज आहे.

श्याम झाड म्हणाले, मागील आठवड्यात श्री.टक्के यांच्या तसेच हडकर यांच्या घराशेजारी विद्युत तारा तुटून पडल्या होत्या. अशा घटनांमुळे कोणतिही जिवीतहानी झाल्यास वीज विभागास जबाबदार धरण्यात येईल. लवकरात – लवकर येथील नागरिकांच्या समस्या न सुटल्यास कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा