सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनुष्यबळाचा होणार कौशल्य विकास
लवकरच सुरू होणार प्रशिक्षण
पुणे येथे म्हाळगी प्रबोधिनीच्या अधिकाऱ्यांची घेतली आम.नितेश राणे यांनी भेट
कणकवली
सामाजिक कार्यकर्ता घडविण्याचे काम करणाऱ्या पुणे येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सहायाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक संस्थांमधील कर्मचारी, पदाधिकारी यांना मनुष्यबळाचा कौशल्य विकास कसा करावा याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या मार्गदर्शनाचा जिल्हयासाठी फार मोठा फायदा होणार आहे.स्वयंवरोजगार निर्माण होऊन गावोगावी भेडसावणारी बोरोजगारी कमी करण्यासाठी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.
आमदार नितेश राणे यांनी पुणे येथे प्राज मॅट्रिक्स या उद्योग समूहाला भेट दिली तेव्हा रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी च्या अधिकाऱ्यांचीही भेट घेतली.प्रबोधिनीच्या कार्यकारी प्रमुख श्रीमती स्वाती महालंक,कार्यालय अधीक्षक राहुल टोकेकर यांनी आमदार राणे यांचे पुस्तक भेट देऊन स्वागत केले. यावेळी डॉ.मिलिंद कुलकर्णी उपस्थित होते.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी च्या माध्यमातून राज्यभर कौशल्य विकासाचे धडे दिले जातात. कार्यकर्ता घडवितांनाच प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सामाजिक भावना जपण्याचेही मार्गदर्शन केले जाते.या संस्थेचे अध्यक्ष राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आहेत.तर अनेक जेष्ठ नेते या संस्थेचे पदाधिकारी आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या कार्याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला व्हावा यासाठी आमदार नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे.लवकरच हे प्रशिक्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू होईल अशी माहिती डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी दिली.