गुजरातकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळणार

गुजरातकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळणार

मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पाचे काम मे अखेर पर्यंत पूर्ण होणार असून यंदाच्या पावसाळ्यात येवला, चांदवडला पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच भविष्यात या प्रकल्पाच्या माध्यमातून गुजरातकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोर्‍यात वळवून भविष्यात मराठवाड्यासह महाराष्ट्राची तहान भागविण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत उपयोगी ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

शुक्रवारी दिंडोरी येथील मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पाच्या सुरु असलेल्या कामांची पालकमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या समवेत पाहणी केली.या अगोदरच मांजरपाडा प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा