झरेबांबर येथे कार गटारात कलंडली

झरेबांबर येथे कार गटारात कलंडली

दोडामार्ग

दोडामार्ग तिलारी राज्यमार्गावर झरेबांबर विमानतळ येथे भरधाव वेगात असलेली कार खड्डे चुकवण्याच्या नादात रस्त्याबाहेर गटारात जाऊन ऊलटली. गुरुवारी सकाळी ही घटना घडली असून सुदैवाने गाडीतील प्रवासी बचावले.

दोडामार्ग ते वीजघर राज्यमार्ग पूर्णतः खड्डेमय होऊन मृत्यूचा सापळा बनला आहे. भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांचे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गुरुवारी सकाळी गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने जाणारी कार विमानतळ येथे आली असता खड्डे चुकविण्याच्या नादात रस्त्याबाहेर गेली. गाडी भरधाव वेगात असल्याने चालकाला गाडीवर नियंत्रण ठेवता आले नाही.

परिणामी गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाहेर गटारात ऊलटली. केवळ दैव बलवत्तर म्हणून या कारमधून प्रवास करणारे तिन्ही प्रवासी बचावले. मात्र दोडामार्ग तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था व रस्त्याच्या उद्ध्वस्त झालेल्या साईडपट्टीमुळे अपघातांचे प्रमाणदेखील दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा