सावंतवाडीतील ‘जस्ट बेक’ केक शॉप ला आग

सावंतवाडीतील ‘जस्ट बेक’ केक शॉप ला आग

एसपीके कॉलेजरोड वरील घटना

सावंतवाडी

रामेश्वर प्लाझा जवळील काॅलेज मार्गावर असलेले गौरव जाधव यांच्या जस्ट बेक बेकरीला आग लागल्याने मोठे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली. दुकानालगत बाजूला थंड पेयांचा बॉक्स ठेवण्यात आला होता. या बॉक्सला अचानक आग लागली.

लागलीच दुकान मालक गौरव जाधव, आनंद गावकर यांना समजतात त्यांनी लागलीच पालिकेचा बंब पाचारण केला. घटनास्थळावर बंब वेळीच दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. शेजारील संजय नाईक व अन्य दुकान चालकानी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला.

ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्यापही स्पष्ट झाले नाही. दुकानातील आतील सामान सुरक्षित राहिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा