रोटरीतर्फे पंचम खेमराज महविद्यालयाच्या केमिस्ट्री लॅबला वॉटर पुरिफायर प्रदान…

रोटरीतर्फे पंचम खेमराज महविद्यालयाच्या केमिस्ट्री लॅबला वॉटर पुरिफायर प्रदान…

सावंतवाडी
रोटरी क्लब ठाणे इंपेरियलच्या अध्यक्षा स्मिता अमेय गुमास्ते यांनी त्यांचे सासरे कै.रो.प्रा.प्रभाकर गुमास्ते यांच्या स्मृती प्रित्यर्थ सावंतवाडीतील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या केमिस्ट्री विभागाला दिलेल्या “वॉटर पुरिफायर” चे उदघाटन हर हायनेस राणीसाहेब शुभदादेवी भोंसले यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब, सावंतवाडीचे अध्यक्ष रो.राजेश नवांगुळ आणि सचिव रो.दिलीप म्हापसेकर यानी पुढाकार घेऊन कार्यक्रमाचे आयोजन केले. मार्च हा महीना “पाणी आणि स्वच्छता” साठी असल्याने रो.डॉ. राजेश नवांगुळ यानी पाण्याचे महत्त्व विषद केले.

रोटरी क्लब, ठाणे इंपेरियलच्या अध्यक्षा सौ.स्मिता गुमास्ते यानी आपले सासरे कै.गुमास्ते सरांचे स्वप्न साकार झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आणि रोटरी सावंतवाडी आणि कॉलेजच्या अध्यक्षा हर हायनेस राणीसाहेबा शुभदादेवी यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी राणीसाहेबानी गुमास्ते कुटूंबियांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा