किर्लोस गावठणवाडी येथे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा उत्साहात

किर्लोस गावठणवाडी येथे आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा उत्साहात

सिंधुदूर्ग :

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त  किर्लोस गावठणवाडी येथे श्री. गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या  वतीने  आज  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नूतनीकरणाचा लोकार्पण सोहळा आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत  उत्साहात पार पडला. यावेळी छ.शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आला. जय भवानी-जय शिवाजी , हरहर महादेव अशा घोषणा देत जयघोष करण्यात आला. तसेच गावठणवाडी थांब्याचे नामकरण  छत्रपती शिवाजी महाराज चौक असे करून आ. वैभव नाईक यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले.

यानिमित्त कु. दुर्गा घाडीगावकर या लहान मुलीने  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य गाथेवर उत्कृष्ट  मनोगत सादर केले याबद्दल आमदार वैभव नाईक यांनी तिचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. मंडळाच्या वतीने देखील आमदार वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.  यावेळी विकास लाड, उत्तम गावकर,दशरथ घाडीगांवकर, निलेश घाडीगांवकर, तेजस घाडीगांवकर, विलास गावकर, भूषण घाडीगांवकर, व मंडळाचे सर्व जेष्ठ व युवा कार्यकर्ते , किर्लोस गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा