You are currently viewing नारायण राणे भाजपाचे नेते… त्यांना पदाधिकारी निवडीचा पूर्ण अधिकार..

नारायण राणे भाजपाचे नेते… त्यांना पदाधिकारी निवडीचा पूर्ण अधिकार..

अनिशा दळवींच्या निवडीमागे पुढील रणनीती; प्रमोद जठार

खासदार नारायण राणे हे आमचे भाजपाचे नेते आहेत. राणे भाजपवासी झाल्यानंतर जिल्हा परिषदेत राणेसमर्थक जि प अध्यक्ष तर उपाध्यक्ष मूळ भाजपाचा आणि चारही विषय समिती सभापती निवडीचे अधिकार राणेंनाच आहेत. राष्ट्रवादीच्या अनिषा दळवी याना सभापतीपद देण्यामागे राणेंची पुढील रणनीती आहे. त्या रणनीतीतून अनेकांची शिकार झालेली येत्या निवडणुकीत दिसून येईल असे सांगत भाजपात जुना नवीन वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी केला.

राष्ट्रवादी च्या अनिषा दळवी याना सभापतीपद दिल्यावरून राजेंद्र म्हापसेकर यांनी दिलेल्या राजीनाम्यावर भाष्य करताना जठार यांनी सांगितले की नारायण राणे यांनी धक्कातंत्र वापरून महाविकास आघाडीचा सदस्य फोडून त्यांना धक्का दिल्याचेही जठार म्हणाले. राणेंनी भाजपात प्रवेश केल्यानंतर मूळ भाजपावासीयांना किंमत राहिलेली नाही असे म्हणणारा कणकवलीतील तेजतर्रार युवा नेता आता सेनेची साथ सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ बांधण्याच्या तयारीत आहे. त्याने आम्हाला निष्ठा शिकवू नये असा टोला संदेश पारकर यांचे नाव न घेता जठार यांनी लगावला. यावेळी भाजपा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख बबलू सावंत उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × four =