सिंधुदुर्गातील आणखी पाच शाळांना प्रयोगशाळा

सिंधुदुर्गातील आणखी पाच शाळांना प्रयोगशाळा

ओरोस 

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजावा, यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद नेहमीच प्रयत्नशील राहिली आहे. यापूर्वी समग्र शिक्षा अभियानमधून जिल्ह्यात 44 जिल्हा परिषदेच्या शाळांना अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा पुरविण्यात आलेल्या आहेत. आता नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत आणखी पाच शाळांना विज्ञान प्रयोगशाळा मंजूर करण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्हा नियोजनमधून 80 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

प्राथमिक शिक्षणा बरोबर विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक गोडवा रुजला पाहिजे. विज्ञान अभ्यासाबाबत आत्मीयता निर्माण झाली पाहिजे. तरच उद्या जिल्ह्यातून वैज्ञानिक तयार होणार आहेत; मात्र यासाठी आवश्‍यक साधन सामग्री उपलब्ध होणे आवश्‍यक आहे.

या आहेत पाच शाळा 
*कीहेत क्रमांक 1 केंद्र शाळा (वैभववाडी)
*इळये क्रमांक 1 (देवगड)
*कासार्डे क्रमांक 1 (कणकवली)
*पडवे क्रमांक 1 (कुडाळ)
*मळेवाड क्रमांक 1 (सावंतवाडी)

पाच शाळा विज्ञान प्रयोगशाळा उपक्रमाअंतर्गत निवडल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक पटसंख्या हा एकमेव निकष लावला आहे. या शाळेला परिसरातील शाळा जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे नजिकच्या शाळांतील मुलांनाही या प्रयोगशाळेचा उपयोग होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा