You are currently viewing कणकवलीत आग लागून संसार बेचिराख

कणकवलीत आग लागून संसार बेचिराख

नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाद्वारे आग आणली आटोक्यात

नगराध्यक्ष समीर नलावडेंकडून त्या महिलेला तातडीची 5 हजार रुपयांची आर्थिक मदत

कणकवली

शहरात शिवसेना शाखेजवळ मोघे हॉस्पिटलच्या बिल्डिंगच्या तळमजल्यातील खोलीत आग लागून रेश्मा हजारे या फळविक्रेते महिलेचा अख्खा संसारच आगीत जळून बेचिराख झाला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच नगरपंचायत अग्निशामक बंबाद्वारे तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत त्या महिलेचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक कन्हैया पारकर, शिवसेना पदाधिकारी सचिन सावंत, चेतन मुंज, रिमेश चव्हाण व नगर पंचायत कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.ती महिला आपल्या घरात देवाजवळ पेटता दिवा ठेवून तेथेच होती. याच दरम्यान अचानक खोलीतील कपडे व गादी ने पेट घेतला. व खोलीत सर्वत्र धुराचे साम्राज्य झाले. त्या खोलीतून येत असलेला धूर पाहून त्या कॉम्प्लेक्सच्या आसपासच्या लोकांनी धाव घेत नगरपंचायतला घटनेची माहिती दिली. नगरपंचायत अग्निशामक बंबाद्वारे आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तोपर्यंत त्या महिलेच्या घरातील कपडे आणि अन्य वस्तू या आगीत बेचिराख झाल्या. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी नगरपंचायत कर्मचारी गणेश लाड, प्रकाश राठोड, विनोद जाधव यांच्यासह अनेकांनी शर्थीचे प्रयत्न केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − twelve =