You are currently viewing कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नूतन जि.प. अध्यक्षा संजना सावंत उतरल्या मैदानात

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नूतन जि.प. अध्यक्षा संजना सावंत उतरल्या मैदानात

करुळ, खारेपाटण चेक नाक्यावर अचानक भेट देत आरोग्य तपासणीचा घेतला आढावा

प्रवाशांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे सौ. सावंत यांनी केले आवाहन

वैभववाडी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संजना सावंत स्वतः मैदानात उतरल्या आहेत. सोमवारी दुपारी त्यांनी करूळ पोलिस तपासणी चेक नाक्याला अचानक भेट देत सुरू असलेल्या आरोग्य तपासणी मोहिमेचा आढावा घेतला. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढणार नाहीत. याची पुरेपूर काळजी सर्वांनी घेऊया. आरोग्य यंत्रणेने ही महामारी रोखण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत. आम्ही सर्व लोकप्रतिनिधी यंत्रणेच्या पाठीशी आहे असे आश्वासन त्यांनी दिले आहे.


तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील भरकटलेली आरोग्य यंत्रणा आमदार नितेश राणे यांनी ताळ्यावर आणली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या रिक्त जागा भरण्यात आल्या तसेच मुबलक औषध साठा उपलब्ध करण्यात आला. नूतन जि. प. अध्यक्ष सौ. सावंत यांनीही तालुका आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी पावले उचलली आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी खारेपाटण चेक नाका व करूळ चेक नाका या ठिकाणी सुरू असलेल्या आरोग्य तपासणी मोहिमेचा आढावा घेतला. तसेच उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य यंत्रणेतील गैरसोयींचा आढावा घेतला.

जिल्ह्यात ये-जा करणाऱ्या वाहनातील प्रवाशांची आरोग्य तपासणी झाली पाहिजे. त्यांच्या नोंदी घेऊन ते ज्या ठिकाणी जाणार आहेत. त्या गावातील सरपंच व शासकीय यंत्रणेला याची माहिती द्या. अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यावेळी भाजपा अध्यक्ष नासीर काझी, कणकवली पंचायत समिती सदस्या तृप्ती माळवदे, कणकवली माजी सभापती दिलीप तळेकर, भारती रावराणे, प्राची तावडे, सरपंच एस. एम. बोबडे, संताजी रावराणे, आशिष रावराणे, तालुका जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलीपे, डॉ. कांबळे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा