You are currently viewing एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षातील उपाययोजनासंदर्भात शिक्षक भारतीने वेधले बोर्डाचे लक्ष!

एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षातील उपाययोजनासंदर्भात शिक्षक भारतीने वेधले बोर्डाचे लक्ष!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याची कोकण विभागीय अध्यक्षांकडे केली मागणी..

तळेरे

या शैक्षणिक वर्षातील एप्रिल व मे महिन्यामध्ये संपन्न होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी परीक्षक/नियामक यांच्या नेमणुका संदर्भात व उत्तर पत्रिका सादर करणे संदर्भात शिक्षक भारती सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हा शिक्षक भारती संघटनेने महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण विभागीय कोकण विभागीय परीक्षा मंडळाचे अध्यक्ष /सचिव यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की,
गतवर्षी covid-19 च्या प्रादुर्भावामुळे दहावी व बारावीच्या परीक्षांचे वार्षिक मूल्यमापन करताना शिक्षकांना अतिशय ताण तणावाच्या वातावरणात काम करावे लागले. यामुळे शिक्षकांना अनेक प्रकारच्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या.

सकाळ सत्रात परीक्षेचे नियोजन केले जावे-

सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून या परिस्थितीत चालू शैक्षणिक वर्षाच्या दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल व मे महिन्यात संपन्न होत आहेत.सध्या कोकणातील covid-19 ची संक्रमणाची स्थिती पाहता व चालू असलेली उष्णतेची लाट ध्यानी घेता सर्व पेपर सकाळ सत्रात घेण्याविषयी विचार करण्या यावे.

गंभीर आजार असलेल्या शिक्षकांना बोर्डाच्या कामकाजातून वगळावे-

गंभीरपणाने विचार व्हावा.
दहावी/बारावी परीक्षेसाठी परीक्षक/नियामक यांच्या नेमणुका करताना रक्तदाब, पक्षाघात,मधुमेह व तत्सम गंभीर आजार असलेल्या शिक्षकांना परीक्षक/नियामक काम देण्यात येऊ नये. परीक्षक/ नियामक यांच्या नेमणुका करताना सर्व शाळातील सर्व विषयवार शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीचे काम देण्यात यावे.

साहित्य मध्यवर्ती ठिकाणी देण्यात यावे-

विषयवार नियामक देताना ते त्या विषयाच्या,त्या भागातील सर्व परीक्षकांना प्रवासाच्या सोयीनुसार मध्यवर्ती असावेत याची दक्षता घेण्यात यावी.
परीक्षकांना नियामक यांचेकडे उत्तरपत्रिकांचे गठ्ठे व आवश्यक स्टेशनरी साहित्य देण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात यावा.

नियामक यांनी परीक्षण केलेले उत्तरपत्रिकांची गठ्ठे व संदर्भीय स्टेशनरी साहित्य जमा करण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांमध्ये तालुकावार मध्यवर्ती ठिकाणांची सोय करण्यात यावी.
सदर ठिकाणी नियामकाकडून उत्तर पत्रिकांचे गठ्ठे व अत्यावशक स्टेशनरी जमा करून घेणेत यावी.
याबाबतच्या आवश्यक सूचना आपल्या स्तरावरून तातडीने संबंधित सर्व शाळांना निर्गमित कराव्यात अशी आग्रही विनंती आहे राज्य प्रमुख कार्यवाहक तथा जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर व कोकण विभागीय अध्यक्ष धनाजी पाटील यांनी कोकण विभागीय अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

संजय वेतुरेकर
धनाजी पाटील

प्रतिक्रिया व्यक्त करा