प्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली माडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. येत्या ३१ मार्च रोजी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत वैशाली राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. पक्षप्रवेशानंतर वैशालीकडे कोणती जबाबदारी दिली जाईल, याबाबत अद्याप काही माहिती समोर आली नाही. राष्ट्रावादी काँग्रेसच्या चित्रपट, कला, साहित्य आणि सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबतची माहिती दिली. वैशालीने आतापर्यंत मराठी चित्रपट, मालिका तसंच हिंदी चित्रपटातील गाणीही गायली आहेत.

- Post published:मार्च 29, 2021
- Post category:बातम्या / विशेष
- Post comments:0 Comments