You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या डाटा सेंटरला ISO मानांकन प्राप्त

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या डाटा सेंटरला ISO मानांकन प्राप्त

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या डाटा सेंटरला ISO 27001:2013 चे मानांकन प्राप्त झाले असुन बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बँकेच्या संवेदवनशील माहितीचे प्रभावी व योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी व त्यात नियमितता राहाण्यासाठी ISO 27001:2013 लागु करण्याचा निर्णय घेतला. कारण रिझर्व बँक ऑफ ईंडियाच्या सायबर सेक्युरिटी फ्रेमवर्क नुसार ग्राहकांच्या माहितीची सुरक्षिततेला महत्त्व देण्यात आले आहे. बँकेने १२/१२/२०१२ रोजी पहिले डाटा सेंटर उभारले. त्यावेळी स्वतःचे डाटा सेंटर उभारणारी सिंधुदुर्ग बँक पहिली जिल्हा ठरली होती. त्यानंतर बँकेने नवीन सुधारणा विचारात घेउन नवीन अद्ययावत डाटा सेंटर १ जुलै २०२१ रोजी उभारले आहे. या डाटा सेंटरचे ISO मानांकन करण्याचे बँकेच्या संचालक मंडळाने ठरवले व मार्च २०२३ मध्ये बँकेच्या ISO 27001:2013 साठी TUV India Pvt. Ltd., या ब्युरोची निवड केली. आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेला ISO मानांकन मिळणे ही फार मोठी कष्टप्रद गोष्ट आहे. परंतु बँकेने ISO मापदंडासाठी आवश्यक त्या नियम व अटींची पुर्तता करुन दि. २५/१०/२०२५ अखेर पर्यंत मुदत असलेले ISO प्रमाणपत्र प्राप्त केले आहे.

ISO मानांकनामुळे सिंधुदुर्ग बँकेचा बँकींग क्षेत्रात नावलौकिक वाढण्या बरोबर बँकेला आवश्यक विविध डिजीटल सुविंधासाठीची परवानगी मिळण्याचा मार्ग सोपा झाला आहे. या मानांकनामुळे बँकेचा तांत्रिक स्वरुपाचा डाटा दर्जात्मक पद्धतीने जपण्याचे काम होणार असुन डेटा सेंटरची फिजिकल व लॉजीकल सिक्युरीटी राखली जाणार आहे. यामुळे नाबार्ड कडील सायबर सिक्युरीटी ऑडीट संदर्भाने अनुपालन करणे तसेच नाबार्डच्या विविध रिपोर्ट बाबतची पुर्तता करणे, डाटा प्रोटेक्शन अक्ट नुसारची करावयाची कार्यवाही करणे सुलभ होणार आहे. एकुणच बँकेची तांत्रिक कार्यपद्धती व कार्यक्षमता वाढण्यास या ISO चा उपयोग होणार असुन ISO प्रमाणपत्र मिळवणाऱ्या काही मोजक्याच बँकामध्ये सिंधुदुर्ग बँकेचा समावेश झाला आहे. ही गोष्ट सिंधुदुर्ग जिल्ह्याला गौरवाची व अभिमानाची असल्याचे मत बँकेचे अध्यक्ष मान. श्री. मनिष दळवी यांनी व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + 12 =