You are currently viewing बांदा-शिरोडा मार्ग वाहतुकीस धोकादायक

बांदा-शिरोडा मार्ग वाहतुकीस धोकादायक

खड्ड्यांमुळे घडतात अपघात, प्रशासनाचे दुर्लक्ष, ग्रामस्थांचा आरोप

बांदा

बांदा-शिरोडा मार्गावरील दांडेली ते शेर्ले दरम्यान खडिकरण व डांबरीकरण येत्या काही दिवसांत होणार असल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामस्थांना दाखवून एक वर्षाचा कालावधी उलटला आहे. दरम्यान तब्बल दोन वेळा खड्ड्यांची डागडुजी करण्यासाठी निधी खर्च करण्यात आला. परंतु अद्याप नियोजित रस्त्याच्या कामास सुरूवात न केल्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे खड्ड्यांत पडून अपघात घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत असून लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन रस्ता निर्धोक करण्याची मागणी होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + 4 =