You are currently viewing सावंतवाडी अर्बन बँकेचे पिग्मी एजंट शशिकांत मिशाळ यांच्या पत्नी सौ.स्मिता शशिकांत मिशाळ यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन.

सावंतवाडी अर्बन बँकेचे पिग्मी एजंट शशिकांत मिशाळ यांच्या पत्नी सौ.स्मिता शशिकांत मिशाळ यांचे हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन.

सावंतवाडी प्रतिनिधी

सावंतवाडी सालईवाडा येथील रहिवासी व अर्बन बँकेचे पिग्मी एजंट शशिकांत मिशाळ यांची पत्नी सौ.स्मिता श. मिशाळ (56) यांचे आज दुपारी १.३० वाजता हृदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले.
आज सकाळी त्यांच्या पाठीत दुखू लागले होते, त्यामुळे त्यांना सावंतवाडी येथे प्रायव्हेट दवाखान्यात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांची प्रकृती पाहून तात्काळ सरकारी दवाखान्यात हलविण्याचा सल्ला दिला. सावंतवाडी येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. चालता बोलता अचानक झालेल्या मृत्यूने मिशाळ कुटुंबियांना धक्काच बसला आहे.
त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सून, दिर, भावजयी असा परिवार आहे. कोंकण रेल्वे मध्ये कामाला असलेले संदेश मिशाळ यांची ती भावजय होय. आज संध्याकाळी ६.०० वाजता उपरल स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − six =