You are currently viewing स्वार्थासाठी शिवसेनेत खोका टाकुन मोबाईल धंदा करणारे संतोष शिरसाट हेच तोडपाणी करणारे शिवसैनिक

स्वार्थासाठी शिवसेनेत खोका टाकुन मोबाईल धंदा करणारे संतोष शिरसाट हेच तोडपाणी करणारे शिवसैनिक

स्वार्थासाठी नेते बदलणाऱ्या लोकांनी मनसेला शिकवू नये; अमित इब्रामपूरकर

मनसेतुन शिवसेनेत जाणाऱ्या तसेच स्वार्थासाठी आणि इतर कामांसाठी मनसे या पक्षातून भाजपा नंतर शिवसेना पक्षात जाणारे संतोष शिरसाट यांनी मनसेच्या मालवण पदाधिकाऱ्यांच्या वाटेला जावू नये.मालवणचे मनसे पदाधिकारी बुद्धिवान आहेत.सेनेच्या उपजिल्हाध्यक्ष पदासाठी आपण इच्छुक होतात त्यावेळी शिवसेनेच्या किती लोकांनी विरोध केला याची माहिती आमच्याकडे आहे. तसेच व्यापारी संघटनेतुन आपल्याला का हाकलण्यात आले आणि कशासाठी याची इत्यंभुत माहिती आमच्याकडे आहे.आपण जर आरोप अशाप्रकारे करत राहीलात तर मनसे स्वस्थ बसणार नाही.स्वतःसाठी पक्ष बदलणारे,आणि राजकिय पदासाठी,स्वतःच्या मुलाच्या मोबाईल धंद्यासाठी पक्ष बदलणारे शिरसाट यांची माहीतीही आमच्याकडे आहे.आपण मनसेवर अशी वक्तव्य कराल तर लवकरच मनसे आपली पोलखोल करणार हे ध्यानात ठेवावे..!!

मनसेतून अन्य पक्षात तोडपाणी करणाऱ्यासाठी जाणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची यादी ही आमच्याजवळ आहे.योग्यवेळी आम्ही जाहीर करु

आपण अगोदर माजी आमदार मा.परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच काम करत होतात.त्यावेळी उपरकर यांची साथ सोडून राजकीय पदांच्या हव्यासापोटी आपण भाजप आणि शिवसेनेत उडी मारलात.त्याची माहिती आमच्याकडे आहे.त्यामुळे तुमच्याच सेनेच्या मुख्यमंत्र्यांनी काढलेले शासकिय आदेश आम्ही नियमांमध्ये दाखवले जे नियम आपल्या पक्षाच्या आमदारांना, शिवसेनेला समजत नाहीत.तेच काम मनसे करत आहे.म्हणुनच तुमच्या आमदारांवर कारवाई संदर्भात पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले.त्यामुळे तोडपाणी करणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांबद्दलचे वक्तव्य वेळीच थांबवावे अन्यथा मनसे स्वस्थ बसणार नाही हे ध्यानात ठेवावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा