You are currently viewing कुडाळ बस स्थानक परिसरात मनसेने उभारला मंडप

कुडाळ बस स्थानक परिसरात मनसेने उभारला मंडप

बनी नाडकर्णी यांची माहिती

प्रवाशांचा होणार उन्हापासून बचाव

कुडाळ

कुडाळ एसटी बस स्थानका परिसरात शेड बांधली नसल्याने प्रवाशांना उन्हात उभे रहावे लागत होते. उन्हाच्या त्रासापासून प्रवाशांचा बचाव होण्याकरिता सत्ताधार्‍यांनी दुर्लक्ष केले असले तरी मनसे च्या वतीने आम्ही मंडप उभारून उन्हापासून प्रवाशांचे रक्षण केले आहे, अशी माहिती मनसेचे राज्य परिवहन कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष जे.डी. उर्फ बनी नाडकर्णी यांनी दिली.
बनी नाडकर्णी म्हणाले, कुडाळ एसटी स्थानकाच्या नूतन इमारतीचे सत्ताधारी व प्रशासनाने घाईघाईत उद्घाटन केले. मात्र याठिकाणी मोठ्या प्रमाणात सोयीसुविधांचा अभाव आहे. या एसटी स्थानक परिसरात प्रवासी शेड न बांधल्यामुळे येथील प्रवाशांना उन्हात उभे रहावे लागत आहे. त्याचा त्रास अनेक प्रवाशांना होत आहे. मात्र ही शेड बांधण्याबाबत स्थानिक आमदार प्रशासन, राज्य सरकार काही पावले उचलताना दिसून येत नाहीत.

त्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासापासून त्यांचा बचाव व्हावा याकरिता आम्ही मनसेच्या वतीने या ठिकाणी मंडप उभारला आहे. त्यामुळे प्रवाशांचे उन्हापासून रक्षण होत आहे. त्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

आता उन्हाळा सुरू असून यानंतर पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे ऊन व पावसाचा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी शेड बांधण्यासाठी आमदार, राज्य सरकार, एसटी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन नाडकर्णी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा