You are currently viewing लोकप्रिय आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पोलीस भरती व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर..

लोकप्रिय आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पोलीस भरती व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिर..

ओबीसी सेल शिवसेना जिल्हाप्रमुख रुपेश पावस्कर यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन…

कुडाळ :

युवासेना कुडाळ आणि पवन फाउंडेशनच्या वतीने कुडाळ मालवण मतदार संघाचे लोकप्रिय आमदार वैभवजी नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पोलिस भरती व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन तहसीलदार कुडाळ जवळील मैदानात करण्यात आले यावेळी शिबिराचे उद्घाटन ओ. बी. सी. सेल शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री. रुपेशभाई पावसकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी प्रशिक्षक अनिकेत पाटील, मंथन पेडणेकर यांना पुष्गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी तालुका प्रमुख राजन नाईक, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, माजी जि. प. अध्यक्ष विकास कुडाळकर, शहर प्रमुख संतोष शिरसाट, युवासेना शहर प्रमुख कृष्णा तेली, युवासेनेचे राजू गवंडे, माजी ग्रा. पं. सदस्य नितीन सावंत, बाळकृष्ण पावसकर शिवसैनिक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणत उपस्थीत होते

प्रतिक्रिया व्यक्त करा