वालावलच्या श्री देवी माऊलीचा वाढदिवस…

वालावलच्या श्री देवी माऊलीचा वाढदिवस…

वालावल/ सुरेखा हडकर :

*कुडाळ तालुक्यातील वालावलच्या श्री देवी माऊलीचा वाढदिवस भक्तिमय वातावरणात पार पडला.*

 

*कोविड-१९ चे संकट असताना देखील सर्व नियम पाळून, आरोग्य पथक तैनात ठेऊन देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.*

 

*दोन दिवस चाललेला या उत्सवात स्थानिक भाविकांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम गर्दी न करता शिस्तबद्धरित्या पार पडले.*

 

*श्री देवी माऊलीच्या उत्सवात विशेष आकर्षण होते ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा माजी खासदार डॉ निलेश राणे.*

*कोकणातील विविध कार्यक्रमात आवर्जून सहभागी होणारे डॉ निलेश राणे यांचे युवा नेतृत्व देवेंद्र नाईक यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.*

*डॉ निलेश राणे हे ग्रामस्थांकडून झालेल्या स्वागताने भारावून गेले. भविकांशी संवाद साधताना श्री देवी माऊली मंदिर परिसरात हायमास्ट दिवे बसविण्यात येणार असल्याचे सांगत, ग्रामस्थांची यापलीकडे आणखी काही मागणी असल्यास हक्काने सांगा असेही सांगितले.*

 

*डॉ. निलेश राणे यांच्यासोबत भाजपाचे बाबा परब, आनंद शिरवलकर, अरविंद सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा