You are currently viewing आपला आमदार… दमदार… वैभव नाईक

आपला आमदार… दमदार… वैभव नाईक

 

*जिल्हाप्रमुख म्हणून आमदार वैभव नाईक यांची शिवसेनेत वर्दी लागली आणि म्हणता म्हणता शिवसेनेला गतवैभव प्राप्त झाले.*

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय दहशत मोडीत काढत जीवाची पर्वा न करता छातीची ढाल करत शिवसैनिकांना धीर देत बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जिल्ह्यात जोमाने वाढविली.*

 

*आपल्या दमदार नेतृवाने मतदारसंघात विविध विकासकामे करत आपला आमदार कसा असावा हे लोकांना दाखवून दिले.*

 

*जनतेसाठी जनतेमध्ये राहणारा, लोकांना ताटकळत न ठेवता आपला आमदार आपल्या गावात मिळू लागला तो म्हणजे आमदार वैभव नाईक.*

 

*विरोधकांना आमने-सामने येण्याच्या भाषेला सामने येत निधड्या छातीचा हा ढाण्या वाघ पोलिसांच्या लाठ्या काठ्यांना देखील घाबरला नाही. अरे ला कारे म्हणणारा आपला माणूस म्हणून जिल्ह्यात वैभव नाईक ओळखला जाऊ लागला.*

 

*शिवसेना औषधालाही शिल्लक ठेवणार नाही म्हणणाऱ्यांना स्वतःचं अस्तित्व टिकविण्यासाठी औषध शोधायला लावणारा पठ्ठा म्हणजे आमदार वैभव नाईक.*

 

*शेतकऱ्यांसाठी, पारंपरिक मच्छिमारांसाठी विविध योजना आणत नेहमीच त्यांच्या संकटात धावून जाणारा संकटमोचक म्हणून आमदार वैभव नाईक यांची ओळख.*

 

*रस्ते वीज पाणी याच बरोबर यावर्षी 300 कोटींचा विकास आराखडा बनवून तो सत्यात उतरण्याचे काम आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.*

 

*साधी राहणी आणि उच्च विचारसरणी या तत्वाने चालणारे आमदार वैभव नाईक कोणत्याही पदाची अपेक्षा न करता जनतेसाठी दिवसरात्र काम करण्यातच धन्यता मानतात.*

 

*सर्वसामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत असलेल्या आमदार वैभव नाईक यांचा आज वाढदिवस….. संवाद मिडियाकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…*

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × two =