महेंद्र चव्हाण, अनिशा दळवी, अंकुश जाधव, शर्वाणी गांवकर भाजपची उमेदवारी दाखल..

महेंद्र चव्हाण, अनिशा दळवी, अंकुश जाधव, शर्वाणी गांवकर भाजपची उमेदवारी दाखल..

सेनेकडून उमेदवारी नाही चारही सदस्य बिनविरोध होणार

सिंधूदुर्गनगरी

सत्ताधारी भाजप कडून जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती पदासाठी शर्वाणी गावकर, समाज कल्याण सभापती पदासाठी अंकुश जाधव तर वित्त व बांधकाम आणि शिक्षण व आरोग्य या दोन सभापती पदांसाठी महेंद्र चव्हाण, डॉ अनिशा दळवी ही नावे जाहिर करण्यात आली आहेत. या चार सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती पदांसाठी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यानी आज निवडणूक लावली आहे.

भू संपादन उपजिल्हाधिकारी वर्षा सिंगन या पीठासन अधिकारी आहेत. जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही प्रक्रिया पर पडत आहे. सकाळी ११ वाजल्या पासून अर्ज वितरण सुरु झाले आहे. दुपारी १ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. दुपारी ३ ते ३.३० या वेळेत अर्ज छाननी व अर्ज माघारी घेणे यासाठी वेळ राखीव आहे. ३.३० वाजता गरज पडल्यास हात वर करून मतदान घेण्यात येणार आहे. मात्र, शिवसेना उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचे समजते. त्यामुळे हे चारही सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा