You are currently viewing अज्ञाताच्या अंधाधुंद वाहन मोडतोड़ प्रकरणी राष्ट्रवादी आक्रमक…

अज्ञाताच्या अंधाधुंद वाहन मोडतोड़ प्रकरणी राष्ट्रवादी आक्रमक…

अंमली पदार्थाच्या सेवनामुळे प्रकार केल्याचा संशयकारवाई करण्यासाठी पोलिस निरिक्षकांना निवेदन

सावंतवाडी

सावंतवाडी शहरात काल मध्यरात्री अज्ञाता कडून चार गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच शहरात मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण देखील वाढले असून, युवा वर्ग मद्यधुंद व अमली पदार्थांच्या नशेत असल्याने हे अपघात होत आहेत. यावर वेळीच कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने सावंतवाडी पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्याकडे केली आहे.

यावेळी शहरात एस पी के कॉलेज जवळ पोलिस चौकी निर्माण करावी तसेच बस स्थानक परिसरातील पोलिस चौकीत कायमस्वरूपी एक महिला व एक पुरुष पोलिस कर्मचारी नियुक्त करावी अशी मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेस ने केली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहरध्यक्ष देवा टेंमकर, अशोक पवार, बावतीस फर्नांडिस, नवल साटेलकर, हिदायतुल्ला खान, ऑगस्टिन डिसोजा, सुरेश वडार, प्रतिक नाईक, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा