You are currently viewing सावंतवाडी-कुणकेरीतील हुडोत्सव यावर्षी सुद्धा गाव मर्यादितच….

सावंतवाडी-कुणकेरीतील हुडोत्सव यावर्षी सुद्धा गाव मर्यादितच….

ग्रामस्थ व प्रशासनाच्या बैठकीत निर्णय; कोरोनाच्या नियमांचे होणार पालन…

सावंतवाडी

कुणकेरी येथील हुडोत्सव यावर्षी सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.३ एप्रिलला होणारा हा उत्सव शासनाच्या नियमांचे पालन करून गाव मर्यादित साजरा करण्याचा निर्णय आज येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
कुणकेरी देवस्थान समिती, गावपंच, सरपंच, पोलिस पाटील, कोविड नियंञण समिती व ग्रामस्थ यांची येथील श्री देवी भावई मंदिरात संयुक्त बैठक पार पडली.
यावेळी सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक शशिकांत खोत, पोलिस सतीश कविटकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 + thirteen =