You are currently viewing पाळणेकोंड धरणात मुबलक पाणी असताना शहरात पाण्याची टंचाई का…?

पाळणेकोंड धरणात मुबलक पाणी असताना शहरात पाण्याची टंचाई का…?

माजी नगरसेवकांचा पालिकेला सवाल; स्वतः पाहणी करून समस्या सोडवेन, मुख्याधिकारी…

सावंतवाडी

शहरातील नागरिकांना एक वेळ सुद्धा पाणी मुबलक मिळत नाही. परंतु पाळणेकोंड धरणात मुबलक पाणी असताना पाण्याच्या अडचणी का? असा सवाल येथील माजी नगरसेवकांनी पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना केला. दरम्यान प्रत्येक प्रभागात मी स्वतः येऊन पाहणी करून समस्या दूर करण्याचा प्रयत्न करू,असे आश्वासन यावेळी श्री जावडेकर यांनी माजी नगरसेवकांना दिले.

माजी नगरसेवकांनी शहरातील पाण्याच्या प्रश्नना संदर्भात मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी माजी नगरसेवक सुरेश भोगटे, सुनील पेडणेकर, विलास जाधव, उमाकांत वारंग, कीर्ती बोन्द्रे, अफरोज राजगुरू आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − 2 =