You are currently viewing महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

पर्यावरण विभाग सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष पांडुरंग उर्फ बाप्पा नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

सावंतवाडी

लाडके व कणखर नेतृत्व प्रदेशाध्यक्ष माननीय श्री आमदार नानाभाऊ पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण विभाग सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष माननीय श्री. पांडुरंग उर्फ बाप्पा नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली वडपिंपळ या वृक्षांचा वृक्षारोपणाचा व मिठाई वाटण्याचा कार्यक्रम मोर डोंगरी या जंगलात पार पडला.

यावेळी प्रमुख उपस्थिती सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ श्री.आनंद परुळेकर युवा नेते श्री. समीर वंजारी व मळगाव येथील जेष्ठ कार्यकर्ते श्री.मनोहर राऊळ त्याचबरोबर परिमंडळ वन अधिकारी- प्रमोद सावंत, वनपाल- प्रमोद राणे व त्यांचे सहाय्यक वनरक्षक- वसंत गेज, आनंद कुराडे, भोजने व पुंडलिक गावडे हे  उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा