You are currently viewing आमदार वैभव नाईक वाढदिवसदिनी २६ रोजी भरगच्च कार्यक्रम…

आमदार वैभव नाईक वाढदिवसदिनी २६ रोजी भरगच्च कार्यक्रम…

कुडाळ :

आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना व कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातर्फे २६ मार्च रोजी भरगच्च कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

नाईक यांच्या प्रयत्नाने मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास झाल्याने जिल्हा शिवसेनेतर्फे सत्कार करण्यात येणार आहे असेही त्यांनी सांगितले. कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, शहर प्रमुख संतोष शिरसाठ, सेना जिल्हाप्रमुख रुपेश पावस्कर, संजय भोकटे, विकास कुडाळकर, अतुल बंगे, बबन बोभाटे, मंदार शिरसाठ, सचिन काळप, जीवन बांदेकर आदी उपस्थित होते.

पारकर म्हणाले, वैभव नाईक यांनी मतदार संघाप्रमाणे जिल्ह्यात शिवसेना मजबूत करण्यात विशेष कामगिरी केली आहे, जिल्ह्याचा ते बुलंद आवाज असल्याने त्यांचा वाढदिवस भरगच्च सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. विषयक सर्व नियम व अटी शर्ती पाळण्यात येणार आहेत. आज पासून सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवसानिमित्त कार्यक्रम सुरू झाले. स्थानिक लोकाधिकार समिती आमदार नाईक यांच्या वतीने बँकींग प्रशिक्षण वर्ग कुडाळ एमआयडीसी येथील संकुलात सुरू करण्यात आला आहे. आमदार नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त २६ मार्च रोजी सकाळी ८.०० वाजता श्री देव कुडाळेश्वर मंदिरात अभिषेक करण्यात येईल. ११.०० वाजता शिवसेना कार्यालय येथे अपंगांना तीनचाकी सायकल वाटप तसेच कोरोना काळात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचारी, आया आणि सफाई  कामगार यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सायंकाळी ४.०० वाजता येथील तहसील कार्यालयात नजीकच्या शासकीय मैदानावर पोलिस भरती प्रशिक्षण देण्यात येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + 2 =