You are currently viewing कुंभार समाज जिल्हाध्यक्षपदी प्रा. नारायण साळवी

कुंभार समाज जिल्हाध्यक्षपदी प्रा. नारायण साळवी

कुंभार समाज जिल्हाध्यक्षपदी प्रा. नारायण साळवी

कार्यकारिणीची बिनविरोध निवड,अनेक मुद्द्यांवर चर्चा

दोडामार्ग

सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाज अध्यक्षपदी प्रा नारायण साळवी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कसाल हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये येथे संत गोरा कुंभार उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्गची पंचवार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरवात गोरोबा काकांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.या सभेमध्ये इतर विषयांबरोबरच २०२३ते २०२८ या पाच वर्षासाठी नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

नूतन कार्यकारिणी अशी:

कार्यकारणीचे अध्यक्ष- प्रा.नारायण साळवी, कार्याध्यक्ष- अनिल शेटकर,
उपाध्यक्ष- दिलीप सांगवेकर व सुहास पिकुळकर
सचिव – राजाराम कुंभार सहसचिव- विकास भोगण
खजिनदार – महेश शिरोडकर
सदस्य- श्यामसुंदर कुंभार,काशीराम कुंभार, गोपाळ शेटकर, सुरेश कुंभार, पुरुषोत्तम वावळीये ,संतोष गुडेकर, ज्ञानेश चिंदरकर, संतोष मणेरीकर, चंद्रशेखर मुळम, महेश कुंभार सल्लागार- साबा पाटकर, दिलीप हिंदळेकर, रघुनाथ मळगावकर व सुनील पाटकर

सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी श्री. चिंदरकर होते यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. शेदुलकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. गुडेकर, माजी जिल्हाध्यक्ष श्री. शिरोडकर, दिलीप हिंदळेकर, साबा पाटकर, माजी सचिव श्री. कुंभार, समन्वय समिती अध्यक्ष चंद्रकांत कुंभार, विस्तार अधिकारी आनंद कुंभार, नारायण माणगावकर, पुरुषोत्तम हरमलकर आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात दहा ते बारा हजार कुंभार बांधव असल्याने ओरोस येथे समाज भवन बांधण्याचा निश्चय केला. तसेच कुंभार बांधवांची पतसंस्था स्थापन करण्याचे सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत यासाठी सर्वांच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली. प्रत्येक गावातील समाज बांधवापर्यंत पोहोचून त्यांच्या व्यथा वेदना समस्या जाणून घेण्याचा निश्चय व्यक्त केला तसेच समाज बांधवांच्या मदतीसाठी हेल्थ ग्रुप ची स्थापना करून नैसर्गिक आपत्ती व इतर कारणातून समाज बांधवांवर संकट आल्यास मदत करण्याचे ठरले.
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. तसेच माती कला आणि मातीपासून आधुनिक पद्धतीने भांडी बनवण्याबाबत प्रशिक्षण देण्याचे ठरले.

प्रतिक्रिया व्यक्त करा