मनसेच्या वतीने सावंतवाडी चौकुळ आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…!!

मनसेच्या वतीने सावंतवाडी चौकुळ आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…!!

सावंतवाडी

मनसेचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी मनसेच्या वतीने चौकुळ ग्रामपंचायत सभागृहात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी 70 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या शिबिराचे उद्घाटन विभाग अध्यक्ष रोशन गावडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले. शाखाध्यक्ष अक्षय जाधव सुरज गावडे प्रथमेश परब सुजित परब तसेच सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.

 

अत्याधुनिक संगणकीय ऑटोमॅटिक जर्मन स्कॅनिंग पद्धतीने तपासणी होणार्‍या या आरोग्य तपासणी शिबिरात ईसीजी तपासणी, संपुर्ण शारीरिक तपासणी अक्युप्रेशर व फिजिओ तपासणी, हृदय व मेंदुच्या रक्त वाहिन्यांची कार्यक्षमता, ECG रिपोर्ट, सफेदपेशी कोलॅजन मॅट्रीक्स, लिव्हर कार्यक्षमता ब्लड शुगर, हृदय व मेंदुच्या पल्स, पचन संस्थेची कार्यक्षमता, मिनरल्स,चॅनल्स व कोलॅटरल्स, पित्ताक्षय जीवनसत्व, रक्तातील चरबीचे प्रमाण, स्वादुपिंड, अॅमिनो अॅसिड, मोठ्या आतड्यांचे आरोग्य, मुत्रपिंड, को-एंझाईम्स, थायरॉइड कार्यक्षमता, फुफ्फुस, अंत:श्राव प्रणाली, पल्स ऑक्सिमीटर, रक्तवाहिन्या, रोग प्रतिकारक प्रणाली, बेसिक फिजिकल क्वॉलिटी,हाडांचे विकार, रक्तातील हेवी मेटल, ट्रेस मिनरल्स,हाड खनिज घनता, डोळ्यांचे आरोग्य, लहान हाडांचे विकार, अॅलर्जी,प्रोस्टेट, हाडांचे आरोग्य, त्वच्या व त्वचेसंबंधित घटक, स्त्रियांकरिता, ह्युमन टॉक्सिन, शरीर रचना विश्लेषण, गायनेकोलिजी, लठ्ठपपणा, मासिक पाळी, स्तनाचे विकार आदींची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली तसेच चौकुळ वासियं तर्फे पुन्हा एकदा मनसेच्या वतीने हा आरोग्य शिबिर त्याठिकाणी घ्यावा अशी विभाग अध्यक्ष रोशन गावडे यांच्याकडे ग्रामस्थांनी मागणी केली असून लवकरच तीही मनसेच्या वतीने पूर्ण करण्यात येईल असे श्री गावडे म्हणाले

प्रतिक्रिया व्यक्त करा