You are currently viewing मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गाडी थांबवून टायर ‘चेक’ करणं महागात पडलं!

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गाडी थांबवून टायर ‘चेक’ करणं महागात पडलं!

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज(दि.२३) सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर रसायनी पोलीस स्टेशन हद्दीत हा अपघात झाला. आरिफ शेख नावाचा ट्रकचालक ट्रक थांबवून टायरच्या दुरुस्तीसाठी गाडीखाली जावून टायर चेक करत होता. त्यावेळी अचानक पाठीमागून आलेल्या दुसऱ्या ट्रकने त्यांच्या ट्रकला जोरदार धडक दिली. त्यामुळे थांबलेला ट्रक पुढे गेला आणि दुसऱ्या ट्रकच्या चाकाखाली आल्याने आरिफ शेखचा जागीच मृत्यू झाला.

तर, पाठीमागून धडक देणाऱ्या ट्रकचा चालक संतोष कुमार गुप्ता या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याला एमजीएम कामोठे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen − 11 =