सत्ता टिकवायची असेल तर रक्तातील नातेवाईकाला नाकारा…

सत्ता टिकवायची असेल तर रक्तातील नातेवाईकाला नाकारा…

पुणे

‘महापालिकेतीलसत्ता टिकावयाची असेल, तर तीन टर्म उमेदवारी दिलेल्या आणि रक्तातील नातेवाइकाला नाकारून नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे,” असे सूचक वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. नगरसेवक कशाला व्हायचे, समाजसेवेसाठी की रिंग करण्यासाठी,’ असा प्रश्‍नही यावेळी पाटील यांनी केल्याने पक्षात खळबळ उडाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीसाठी शहर भाजपकडून मंडलनिहाय (मतदार संघ) अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार रविवारी पर्वती आणि शिवाजीनगर या दोन मंडलाचा अभ्यास वर्ग झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार, सोशल मीडियाचे महत्त्व, केंद्र सरकारच्या योजना, गेल्या पाच वर्षांत राज्यातील सत्तेत असताना पक्षाने केलेली कामे आणि महापालिकेतील चार वर्षांतील कारभारावर या अभ्यास वर्गात चिंतन करण्यात आले

प्रतिक्रिया व्यक्त करा