अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक गळतीची नुकसान भरपाई मिळावी

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिक गळतीची नुकसान भरपाई मिळावी

कुडासे ग्रामस्थानचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन

दोडामार्ग/ सुमित दळवी :-

ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सुपारी माड इत्यादी बागायती पिकाचे नुकसान झालेले आहे. याची नुकसानभरपाई त्वरित मिळावी यासाठी आज मौजे कुडासे ग्रामस्थांनी उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदन दिले. गेल्या वर्षी व यंदा सलग दोन वर्ष अतिवृष्टी झाल्यामुळे सुपारी माड इत्यादी पिकांची गळती झालेली आहे. त्यामुळे उत्पादन घटून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात आहे. यासाठी या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.यावेळी रामदास मेस्त्री, रवींद्र देसाई, लक्ष्मण राऊत हे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा