You are currently viewing कलमठ ग्रामपंचायतीतर्फे संविधान दिन उत्साहात साजरा
Oplus_16908288

कलमठ ग्रामपंचायतीतर्फे संविधान दिन उत्साहात साजरा

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना संविधानाची प्रत भेट

कणकवली / कलमठ : संविधानाने प्रत्येक नागरिकाला माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार आणि प्रेरणा दिली आहे. या संविधानाचे महत्त्व प्रत्येकाने जाणून घेऊन त्यातील मूल्यांचे जतन करणे आवश्यक आहे, या भावनेतून कलमठ ग्रामपंचायतीच्या वतीने संविधान दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

कलमठ येथील सिद्धार्थ कॉलनी परिसरात ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या संविधान स्तूपाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संविधानाचे सामूहिक वाचनही करण्यात आले. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेतील कलमठ येथील घरकुल लाभार्थ्यांना संविधानाची प्रत भेट देण्यात आली.

यावेळी बोलताना सरपंच संदिप मेस्त्री म्हणाले की, संविधानाने खऱ्या अर्थाने प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आणि प्रेरणा दिली आहे. आपल्या कार्यकाळात ग्रामपंचायतीच्या वतीने गावात संविधान स्तूप उभारण्यात आला, याचा आपल्याला कायम अभिमान राहील.

या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य नितीन पवार, सिद्धार्थ कॉलनीचे चेअरमन सूर्यकांत कदम, महादेव कदम, श्रद्धा कदम, माधवी कदम, रोहन कदम, घरकुल लाभार्थी सुनीता पाटकर, ग्रामपंचायत कर्मचारी महेंद्र कदम, गणेश सावंत, खुशाल कोरगावकर, अण्णा सावंत आणि शैलेश कदम उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा