You are currently viewing श्री राधाकृष्ण मंदिरातील दीड महिन्याच्या काकड आरतीची भक्तिमय वातावरणात सांगता

श्री राधाकृष्ण मंदिरातील दीड महिन्याच्या काकड आरतीची भक्तिमय वातावरणात सांगता

श्री राधाकृष्ण मंदिरातील दीड महिन्याच्या काकड आरतीची भक्तिमय वातावरणात सांगता

महाप्रसादाचे आयोजन; व्यापारी व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

फोंडाघाट

श्री राधाकृष्ण मंदिरात गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या काकड आरतीची आज भक्तिमय वातावरणात सांगता झाली. दररोज पहाटे ठीक साडेपाच वाजता काकड आरतीला सुरुवात होत असे. यामध्ये परिसरातील नागरिक, व्यापारी व भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी होत होते.
काकड आरतीदरम्यान संपूर्ण हरिपाठाचे पठण केल्यानंतर विविध आरत्या म्हटल्या जातात. त्यानंतर भाविकांना तीर्थ, लोणी आणि प्रसादाचे वाटप केले जाते. या संपूर्ण उपक्रमामुळे मंदिर परिसरात दीड महिना आध्यात्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
आज काकड आरतीच्या सांगतेनिमित्त बाजारपेठेतील सर्व नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांनीही उपस्थित राहून महाप्रसादासाठी देणगी दिली. यापूर्वीही त्यांनी एका दिवशी प्रसादाचे योगदान दिले होते.
यावेळी बोलताना अजित नाडकर्णी म्हणाले की, काकड आरतीला उपस्थित राहिल्यानंतर मनामध्ये एक वेगळाच आध्यात्मिक विचार आणि प्रसन्नता निर्माण होते. श्री राधाकृष्णाच्या चरणी श्रद्धेने केलेली प्रार्थना मनाला समाधान देते. अनेक भाविकांच्या मनोकामना श्री राधाकृष्णाच्या कृपेने पूर्ण होतात, अशी आमची श्रद्धा आहे.
आजही बाजारपेठेतील अनेक व्यापारी दररोज श्री राधाकृष्णाचे दर्शन घेऊन आपल्या व्यवसायाची सुरुवात करतात. हे मंदिर सर्वांसाठी श्रद्धेचे आणि प्रेरणेचे स्थान आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा