You are currently viewing राष्ट्रीय स्तरावरील पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल च्या हीना सारंगची चमकदार कामगिरी,

राष्ट्रीय स्तरावरील पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल च्या हीना सारंगची चमकदार कामगिरी,

राष्ट्रीय स्तरावरील पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल च्या हीना सारंगची चमकदार कामगिरी,

*रौप्यपदकावर कोरले नाव!*

सावंतवाडी

दुर्ग (छत्तीसगड) येथे राष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या वेस्ट इंडिया सब-ज्युनियर, ज्युनियर व सीनियर (मुले व मुली) क्लासिक पॉवरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल ची विद्यार्थिनी कु. हीना सारंग हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

२५ ते २७ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत खालसा स्कूल/कॉलेज, मालवीय नगर चौक, दुर्ग (छत्तीसगड) येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते , दुर्ग जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने पॉवरलिफ्टिंग इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली.

या स्पर्धेत कु. हीना सारंग हिने सब-ज्युनियर वयोगटातील ४३ किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत रौप्यपदक पटकावले असून द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत पदक मिळवून हीनाने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तिच्या या यशामुळे शाळेच्या शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हीनाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे संस्थापक ऍडव्होकेट श्री. रुजुल पाटणकर, संचालक मंडळ, मुख्याध्यापिका सौ प्राची साळगावकर, शिक्षकवृंद आणि संपूर्ण शाळा परिवाराच्या वतीने तिचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून तिच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा