You are currently viewing जागतिक कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐 – मनकवडा

जागतिक कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐 – मनकवडा

मनातलं साचलेलं सर्व,
शब्दरूपी काव्यातून उतरतं,
डोळ्यातलं पाणी हळूच,
थेंब थेंब गालावर ओघळतं.

शब्द नसतात परके,
आपल्याच हृदयातच राहतात.
हृदयातील माणसांचेच शब्द,
कधी कधी मनाला टोचतात.

रंग नसतो लाल त्या,
वाहणाऱ्या पाण्याला.
म्हणून तर लोक हसतात,
पाहून डोळ्यातल्या रक्ताला.

वेदना कळून येत नाही,
डोळ्यातून वाहत्या पाण्यातील..
कंठ गोड असला तरी दर्द,
कळतो गायकाच्या गाण्यातील.

(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा